शाखा
हवाई मार्ग :-
सर्वात जवळचा विमान तळ पूणे येथे असुन तेथुन कोंझर गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग :-
सर्वात जवळची कोकण रेल्वे स्थानके माणगाव व वीर येथे असुन तेथुन अनुक्रमे 50 किलोमीटर अंतराव आहे व रस्त्याने जोडलेले आहे.
इतर वाहनाने :-
कोंझर गावी पोहचन्यासाठी अहमदाबाद पासुन अहमदाबाद, बरोडा, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, भिवंडी, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, इंदापूर, माणगाव, लोणेरा, महाड येथे पोहचाल. महाड बस स्थानकावरून बस प्रवास व शिवाजी चोकमधून मिनिडोअर प्रवास करून कोंझर गावी पोहचु शकाल.
(महाड ते कोंझर अंतर 17 किलोमीटर आहे)
श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे
सुरत शाखेचा इतिहास

ιι श्री वाघजाई माता प्रसन्न ιι

 प्रगतीच्या वाटचालीकडे ...... श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ, सुरत ......

 शिक्षण, उद्योग व नोकरी निमित्ते कोंकण प्रांतातील कोंझर गाव ( रायगड जिल्हा ) ची मंडळी या गुजरात राज्यात येऊन स्थायी झाली. काही मंडळी तर महाराष्ट्र राज्याच्या स्वातंत्र्य पूर्वी स्थायी झाली आहेत. ब्रिटीश काळात मुंबई राज्य महाराष्ट्र व गुजरात मिळून होते. त्यामुळे आपल्यां पूर्वजांना व्यवसाय व नोकरी निमित्ते या गुजरात राज्याची ओढ लागली असावी तसेच नवसारी, सोनगड, व्यारा, बडोदा येथे गायकवाडांचे अधिपत्य होते. त्यामुळे काही लोक सैनिक, पोलीस (नोकरी) निमित्ते येऊन स्थायी झाले होते. आज कोंझर गावचे ग्रामस्थ गेली ५ ते ६ दशके या सुरत शहरात रहात आहेत.

    आपल्याला ऐतिहासिक वारसा व परंपरा आहेत, परंपरेनुसार आपण एकत्र आले पाहिजे, रुढीनुसार जवळीक साधली पाहिजे, समाज म्हणून आपण संघटीत व्हायला हवं! ते आपले प्रश्न सोडविण्यासाठी, आपल खानदानी अस्तित्व टिकविण्यासाठी, आपली परंपरा, संस्कृती जपण्यासाठी या हेतूनेच सन १९५३ रोजी श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ या सेवाभावी मंडळाची सुरत शाखेची स्थापना करण्यात आली. या संघटनेने सुरत शहरातील कोंझर ग्रामस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि यशस्वी झाला आहे. याचे श्रेय नक्कीच आपल्या पुर्वजांना, सर्व कार्यकर्त्यांना, समाज प्रेमी ग्रामस्थाना दयावे लागेल. आपण कुटूंब,सगेसोयरे म्हूणन जपत आलो, पण समाज म्हूणन न्हवे !

आज आपण सर्व ग्रामस्थाना एकत्र केले आहे. आपला परस्पर परिचय नात्याने अथवा व्यक्तिगत कार्यक्रमामुळे होत असतो. परंतु सामाजिक कार्यासाठी नव्हे ! आज आपण एक सामाजिक संघटना कोंझर ग्रामस्थांची, या सुरत शहरात उभी केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सामुहिक लग्न पद्धती ( वधू-वर सूचक समिती) होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, हुशार विद्यार्थी तसेच एखाद्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या ग्रामस्थांचा सत्कार म्हणजेच गुणगौरव सोहळा, परस्पर परिचय व स्नेहवर्धन वाढविण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळ, सुरत करीत आहे. म्हणूनच आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांची व कोंझर गावाची माहीती आपणास देत आहोत. काही मंडळी स्मरणिका छापून अशा प्रकारची माहिती देत असतात. आज आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे जाऊन वेबसाईट वरुन हि माहिती देत आहोत याचा नक्कीच आपण ग्रामस्थ्याना फायदा होईल.

    प्रत्येक ग्रामस्थाने आपली ऐतिहासिक उज्वल परंपरा लक्षात ठेवावी व बदलत्या काळात प्रगतीच्या मार्गाचा ध्यास धरावा. ग्रामस्थाच्यात किंबहुना समाजात अनेक त्रूटी आहेत. ऐटीत जगने, स्वतःला मोठे समजणे, मराठा म्हणून फक्त मिरवणे, या मनोवृत्तीच्या द्रष्ट चमगतून समाजाने/ग्रामस्थांनी बाहेर पडावे आणि विज्ञानाची कास धरावी. या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास कोंझर ग्रामस्थांची माहिती व इतर सामाजिक घडामोडी बाबत वृतांत देणार आहोत. ग्रामस्थ्यांची प्रगती होण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे. प्रत्येक ग्रामस्थ चारित्र्य संपन्न व ध्येयवादाने झपाटलेला असावा. स्वबळावर प्रगतीच्या वाटेची कास धरणारा असावा.

   

Read more




             
 
 
Konzar Gav welcomes you . hit counter free
 
  Copyright © 2012 All Rights Reserved. Powered by : Witech Digital Solutions